आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताचा माजी क्रिकेटपटू श्रीधरन श्रीरामला सल्लागारपदी नेमले आहे, श्रीरामबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू माइक हसीदेखील संघासाठी सल्लागाराचे काम पाहणार आहे.
‘‘भारतामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे, हे पाहणे श्रीरामचे काम असेल, ’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सांघिक कामगिरीचे कार्यकारी महाव्यवस्थापक पॅट होवार्ड यांनी सांगितले.