रिओ ऑलिम्पिकच्या पूर्वी कोर्टवरील संघर्षमयी सामन्यांच्या मालिकेमुळे ऑलिम्पिक तयारी करण्यास मदत झाल्याचे भारतीय बॅडमिंटन स्टार  किदंम्बी श्रीकांतने दिली आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार खेळीसाठी करण्यास श्रीकांत सज्ज झाला आहे. २०१४ मध्ये चीन ओपन आणि सुपर प्रिमियर लीगचा किताब जिंकणाका श्रीकांत हा पहिला भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. यावेळी श्रीकांतने दोनवेळा ऑलिम्पिक आणि पाचवेळा विश्वविजेत्या लिन डेनला पराभूत केले होते. मागील वर्षी घरच्या मैदानावर श्रीकांतने चांगली कामगिरी केली आहे. जून २०१५ मध्ये त्याने जागतिक बॅडमिन क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर मजल मारली होती. मात्र, यावर्षी त्याला आपल्या खेळात सातत्य राखता आलेले नाही. परिणामी त्याच्या जागतिक क्रमवारीत घसरण झाली. श्रीकांत बॅडमिंटन क्रमवारीत सध्या अकराव्या स्थानी आहे. घसरलेल्या क्रमवारीबद्दल बोलताना श्रीकांतने क्रमवारीपेक्षा खेळावर अधिक लक्ष केद्रीत करत असल्याचे म्हटले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खेळणारा श्रीकांत हा अनुभवी खेळाडू असल्याने त्याच्याकडून भारताला पदकाची आस आहे. पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये श्रीकांतसमोर लीन डॅन आणि मलेशियाच्या ली चॉंग वुईचे आव्हान असणार आहे. आगामी ऑलिम्पिकपुर्वी सरावानंतर संघर्षमयी खेळीसाठी सज्ज असल्याचे संकेत श्रीकांतने दिले आहेत.