News Flash

ऑलिम्पिक पात्रतेसाठी श्रीकांतची अग्निपरीक्षा

ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा'

ऑलिम्पिक पात्रतेसाठी श्रीकांतची अग्निपरीक्षा
(संग्रहित छायाचित्र)

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील धक्कादायक पराभवानंतर भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने ऑलिम्पिक पात्रतेकरिता गुण मिळवण्यासाठी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ऑरलिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचे ध्येय ठेवले आहे.

सायना नेहवालने मांडीच्या दुखापतीमुळे ऑल इंग्लंड स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातून माघार घेतली होती. या दुखापतीतून ती सावरली असली तरी तिच्या समावेशाविषयीचा निर्णय बुधवारी घेतला जाणार आहे.

अव्वल मानांकित श्रीकांतला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून सायनाची सलामी मलेशियाच्या किसोना सेल्वादुराय हिच्याशी होईल. पाचवा मानांकित पारुपल्ली कश्यप, सातवा मानांकित एचएस प्रणॉय तसेच सिरिल वर्मा आणि चिराग सेन या भारताच्या खेळाडूंना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. शुभंकर डेला पहिल्या फेरीत डिटलेव्ह होल्म याच्याविरुद्ध खेळावे लागेल.

अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या महिला दुहेरी जोडीला अमेली मेगलँड आणि फ्रेजा रावन यांच्याशी लढत द्यावी लागेल. प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की या मिश्र दुहेरी जोडीची गाठ ज्युलियन माइओ आणि लिया पालेर्मो यांच्याशी पडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 12:48 am

Web Title: srikanth ordeal for olympic qualification abn 97
Next Stories
1 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची प्रेक्षक गॅलरी कोसळून १०० जण जखमी
2 सलग तिसरा पराभव टाळण्याचे भारताचे लक्ष्य
3 आयपीएलंनतर श्रेयस अय्यर करणार ‘इंग्लंडवारी’…वाचा कारण
Just Now!
X