ग्वांग्जू (कोरिया) : भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांचे गुरुवारी कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील उपउपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आले आहे.जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या श्रीकांतचा जपानच्या कांता त्सुनेयामाने पराभव केला. ३७ मिनिटे चाललेला हा सामना कांताने २१-१४, २१-१९ अशा फरकाने जिंकला. सौरभला कोरियाच्या किम डाँगहुनकडून १९-२१, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला. हा सामना ४० मिनिटे रंगला. या दोघांच्या पराभवांसह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.