आयपीएलमधील सामनानिश्चिती व सट्टेबाजी या गोंधळाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हेच जबाबदार आहेत. सर्व गैरव्यवहारांचे श्रीनिवासन हेच मूळ जनक आहेत. अशा शब्दांत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी टीका केली आहे.
स्पर्धेतील गैरव्यवहारांबाबत जर बीसीसीआयने योग्य वेळी कारवाई केली असती, तर अशा गंभीर घटना घडल्या नसत्या. तसेच दोन फ्रँचाईजींवरील बंदीमुळे झालेली बदनामी टाळता आली असती, असे सांगून मनोहर म्हणाले, ‘‘ लोढा समितीने जे काही निर्णय घेतले आहेत, त्यानुसार अंमलबजावणी करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. श्रीनिवासन यांनी २०१३ मध्येच आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. ’’