News Flash

विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, घरच्या मैदानावर मिळणार बहुमान

सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा लावणार हजेरी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या फिरोजशहा कोटला मैदानावरील एका स्टँडला आता विराट कोहलीचं नाव देण्यात येणार आहे. १२ सप्टेंबररोजी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बिशनसिंह बेदी, मोहींदर अमरनाथ यांच्यानंतर फिरोजशहा कोटला मैदानावर असा बहुमान मिळवणारा कोहली तिसरा खेळाडू ठरला आहे.

विराट कोहलीव्यतिरीक्त यंदाच्या हंगामात स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या अन्य क्रिकेटपटूंचाही या सोहळ्यात सत्कार होणार आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी याविषयी माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू या सोहळ्याला हजर राहणार आहेत. नुकतीच विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची ११ वर्ष पूर्ण केली आहेत. सध्या विराट भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. २२ ऑगस्टपासून भारत आणि विंडीज यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 3:31 pm

Web Title: stand for virat kohli awards for delhis best says ddca psd 91
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 स्मिथला डिवचणाऱ्या प्रेक्षकाची स्टेडिअममधून हकालपट्टी
2 दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघाची घोषणा
3 “संधी मिळताच अण्वस्त्र वापरून भारताला साफ करून टाकू”; जावेद मियांदादची दर्पोक्ती
Just Now!
X