News Flash

जीवे मारण्याची धमकी मिळालेल्या क्रिकेटपटूने स्वत:च मागितली माफी, कारण…

पाहा नक्की काय आहे प्रकरण...

बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकीब अल हसन याने कोलकातामधील काली पूजेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याबद्दल त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. IANSच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सिल्हेटचा रहिवासी असलेल्या मोहसीन तालुकदार याने शाकिबला ठार मारण्याची धमकी दिली. काली पूजेला हजेरी लावत शाकिबने मुस्लीम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप त्याने केला. तसेच शाकिबला ठार करण्यासाठी गरज पडल्यास सिल्हेटहून ढाक्यापर्यंत चालत येईन अशी धमकीही त्याने फेसबुक लाइव्हमधून दिली. त्यानंतर आता शाकिबने स्वत:च माफीनामा प्रसिद्ध केला आहे.

शाकिबने काली पूजेसाठी हजेरी लावून मुस्लीमांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्याबद्दल बोलताना शाकिब म्हणाला, “मी पूजेच्या कार्यक्रमासाठी केवळ २ मिनिटं व्यासपीठावर होतो. लोकांचा असा समज झाला की मी त्या पूजेच्या कार्यक्रमाचे उद्धाटन केले. पण मी असं काहीही केलेलं नाही. मी मुस्लीम आहे त्यामुळे अशाप्रकारची कृती नक्कीच करणार नाही. मी तिथे जायलाच नको होतं. झालेल्या गैरसमजाबद्दल मला माफ करा. मी नेहमी इस्लाम धर्माचं पालन केलं आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो”, असं शाकिबने ऑनलाइन फोरमशी बोलताना स्पष्ट केलं.

दरम्यान, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून धमकी देणाऱ्या तालुकदारने घडलेल्या प्रकारानंतर काही वेळाने पुन्हा फेसबुक लाइव्ह करत धमकी देण्याबद्दल माफी मागितली होती. परंतु त्याचसोपबत, क्रिकेटपटू आणि इतर सेलिब्रिटी धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा ‘योग्य मार्गा’चा अवलंब करावा असा पुनरूच्चारही केला होता. धमकी देतानाचा तो व्हिडीओ सध्या सोशल मिडियावरून काढून टाकण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 4:14 pm

Web Title: star cricketer shakib al hasan apologises after death threats over attending hindu ceremony vjb 91
Next Stories
1 श्रेयस अय्यरमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचे गुण आहेत !
2 पुढील हंगामात लिलाव झाल्यास CSK ने धोनीला सोडून द्यावं – आकाश चोप्रा
3 “ये क्या बवासीर…”; मुंबईकर खेळाडूने उडवली नव्या क्रिकेट नियमांची खिल्ली
Just Now!
X