करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली असून नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. होम क्वारंटाइनच्या काळात अनेक जणं सध्या विविधी छंद जोपासत आहेत.

मात्र सध्याच्या काळात क्रिकेट प्रेमींची चांगलीच गैरसोय झालेली आहे. आयपीएल स्पर्धा सध्या जवळपास रद्द होण्याच्या स्थितीत आहे. भारतीय संघाचं यंदाच्या वर्षातलं वेळापत्रक पाहता जुन-जुलै महिन्यापर्यंत भारत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाहीये. अशा क्रिकेटप्रेमींसाठी Star Sports ही वाहिनी…४ ते १० एप्रिल या काळात भारत विरुद्ध पाकिस्तान या संघाचे सामने पुन्हा दाखवणार आहे. ४ एप्रिलपासून सकाळी ११ वाजता हे सामने दाखवण्यात येणार आहेत.

केव्हा पाहता येतील हे सामने, जाणून घ्या…

१) ४ एप्रिल – १९९२ चा विश्वचषक

२) ५ एप्रिल – १९९६ चा विश्वचषक

३) ६ एप्रिल – १९९९ चा विश्वचषक

४) ७ एप्रिल – २००३ चा विश्वचषक

५) ८ एप्रिल – २०११ चा विश्वचषक

६) ९ एप्रिल – २०१५ चा विश्वचषक

७) १० एप्रिल – २०१९ चा विश्वचषक