05 March 2021

News Flash

भारत दौऱ्याआधी कांगारुंना मोठा धक्का, मिचेल स्टार्क दुखापतीमुळे बाहेर

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा

24 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भारत दौऱ्याआधी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे कांगारुंचा महत्वाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क संघाबाहेर गेला आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 बळी घेत स्टार्क ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र याच सामन्यादरम्यान त्याच्या स्नायूंवर ताण आल्याचं बोललं जातंय, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला भारताविरुद्ध मालिकेच्या संघात जागा दिली नाहीये.

भारत दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ 2 टी-20 आणि 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना ऑस्ट्रेलियाला भारताकडून कसोटी आणि वन-डे अशा दोन्ही मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी यंदा ऑस्ट्रेलियन संघाकडे उपलब्ध असणार आहे.

भारत दौऱ्यासाठी असा असेल ऑस्ट्रेलियन संघ

अरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), अॅलेक्स केरी (उप-कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, नॅथन कुल्टर-नाईल, पिटर हँडस्काँब, उस्मान ख्वाजा, नॅथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, अॅश्टन टर्नर, अॅडम झाम्पा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 8:08 am

Web Title: starc out of india tour due to pectoral tear
टॅग : Ind Vs Aus
Next Stories
1 इम्रान आणि कोहलीच्या नेतृत्व गुणांमध्ये साम्य
2 चांगली सर्व्हिस निर्णायक ठरू शकते – भांबरी
3 Ranji Trophy : सौराष्ट्रची हाराकिरी; विदर्भ जेतेपदापासून ५ पावलं दूर
Just Now!
X