राज्य कबड्डी संघटनेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, धुळ्याच्या महेंद्रसिंग राजपूत आणि पुण्याच्या किशोरी शिंदेला उत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट पकडपटू म्हणून पुण्याच्या विकास काळेची निवड करण्यात आली आहे. ‘लोकसत्ता’चे प्रशांत केणी यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्म दिन कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा हा दिन जालना येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या वेळी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मंगलकलश, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सविस्तर पुरस्कार यादी  
बाबाजी जामसंडेकर, मुकुंद जाधव, महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती
किशोर मुले- रोहित पाटील, ज्ञानेश्वर डुकरे, शुभम पाटील
किशोर मुली- सोनाली हेळवी, आरती बोडके, श्रुती जाडर
कुमार मुले- सुनील सिद्धगवळी, आकाश गोजारे, रवींद्र कुमावत
कुमार मुली- सोनाली शिंगटे, सायवा हळदकेरी, सायली जाधव.
जगन्नाथ चव्हाण यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती
किशोर मुले- ज्ञानेश्वर खिलारे, किशोर मुली- काजल इंगळे
मधू पाटील स्मृती पुरस्कार (उत्कृष्ट पुरुष खेळाडू)- महेंद्रसिंग राजपूत
अरुणा साटम स्मृती पुरस्कार (उत्कृष्ट महिला खेळाडू)- किशोरी शिंदे
मल्हारी बावचकर पुरस्कार (उत्कृष्ट पुरुष पकडपटू)- विकास काळे
ज्येष्ठ कार्यकर्ता- द्वारकादास पाथ्रीकर
ज्येष्ठ पंच- भीम गायकवाड
ज्येष्ठ पत्रकार- प्रशांत केणी
कृतज्ञता पुरस्कार- बबनराव लोकरे
सातत्यपूर्ण कबड्डी स्पर्धा आयोजक संस्था- पाचगणी व्यायाम मंडळ
राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून प्रथम जिल्हा संघ- पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक संस्था- पुणे महानगरपालिका, पुणे
कबड्डी दिन आयोजक संस्था- निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्ट, जालना<br />महाकबड्डी अंतिम संघाचे मालक- ठाणे टायगर्स (पुरुष आणि महिला)