09 July 2020

News Flash

राज्य कबड्डी संघटनेकडून पाच जणांवरील बंदी उठवली

तीन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांवरील बंदी उठवली आहे.

संग्रहित छायाचित्र

 

गतवर्षी पाटणा येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पराभवाला कारणीभूत ठरल्यामुळे बंदी घालण्यात आलेल्या तीन खेळाडूंसह प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांवरील बंदी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने सोमवारी उठवली आहे.

टाळेबंदीमुळे ‘झूम’द्वारे झालेल्या राज्य संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत खेळाडूंच्या नोकऱ्या आणि भवितव्याच्या दृष्टीने बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली. गतवर्षी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीतच गारद झालेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाची राज्य कबड्डी संघटनेकडून चौकशी करण्यात आली. सर्व खेळाडूंची लेखी परीक्षासुद्धा घेण्यात आली होती. त्यानंतर प्रशिक्षक श्रीराम भावसार आणि दीपिका जोसेफ यांच्यावर पाच वर्षांची, तर कर्णधार सायली केरिपाळे, स्नेहल शिंदे आणि व्यवस्थापिका मनीषा गावंड यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

कबड्डीमहर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनी १५ जुलैला कबड्डी दिनाचा होणारा वार्षिक कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. मात्र जिल्हा संघटनांनी करोनाच्या पार्श्वभूमीवरील नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पाटील यांनी केले. राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:12 am

Web Title: state kabaddi association ban on five people was lifted abn 97
Next Stories
1 ‘आयसीसी’ एलिट पंचांच्या यादीत भारताचे नितीन मेनन
2 जो रुट विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीला मुकणार, बेन स्टोक्स इंग्लंडचा कर्णधार
3 “…म्हणून हिटमॅन-गब्बरची जोडी ‘लय भारी”
Just Now!
X