20 September 2020

News Flash

सरपंचांना मारहाण; खेळाडूवर एक वर्षांची बंदी

पुरुष गटातील कोल्हापूरविरुद्धच्या सामन्याच्या वेळी सरपंच सूर्यकांत राऊळ यांना मारहाण केल्याबद्दल अहमदनगर संघाच्या अजहर सय्यद शेखवर एक वर्ष बंदीची कारवाई करण्यात आली.

| December 22, 2014 04:00 am

पुरुष गटातील कोल्हापूरविरुद्धच्या सामन्याच्या वेळी सरपंच सूर्यकांत राऊळ यांना मारहाण केल्याबद्दल अहमदनगर संघाच्या अजहर सय्यद शेखवर एक वर्ष बंदीची कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर व अहमदनगर यांच्यात सकाळच्या सत्रात झालेला पुरुष गटाचा सामना १८-१८ असा बरोबरीत सुटला. या सामन्यात शेवटचे मिनिट बाकी असताना सरपंच सूर्यकांत राऊळ यांनी दिलेल्या एका निर्णयावरून दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची सुरू झाली. नगर संघाच्या अजहर सय्यद शेखने राऊळ यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे आणखीनच गोंधळ निर्माण झाला. साहजिकच पोलिसांना पाचारण करावे लागले, तरीही बराच वेळ गोंधळ सुरूच होता. पंचांनी सामना बरोबरीत संपल्याचे जाहीर केले. बेशिस्त खेळाडूवर त्वरित शिस्तभंगाची कारवाई केली नाही, तर स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी पंचांनी दिली. अखेर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या खेळाडूवर एक वर्ष कोणत्याही स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 4:00 am

Web Title: state kabaddi competition player beaten up sarpanch
Next Stories
1 महाराष्ट्राचा दुहेरी धमाका
2 उत्तर प्रदेशची दमदार सुरुवात
3 सचिन २०१५च्या विश्वचषकाचा सदिच्छादूत
Just Now!
X