तेलंगणला होणाऱ्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेकरिता राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पध्रेद्वारे संघ निवडणे कठीण झाल्यामुळे मैदानी निवड चाचणी प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी दिली.

तेलंगण येथे २२ ते २५ मार्च या कालावधीत कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. परंतु सध्या करोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जळगावला ५ ते ८ मार्च यादरम्यान कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणे कठीण आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत ही स्पर्धा न घेता मैदानी निवड चाचणी घेण्याचे गुरुवारी झालेल्या कार्यकारणी मंडळाच्या ऑनलाइन सभेत ठरवण्यात आले. सर्व संलग्न जिल्हा संघटनेच्या निवडक कुमार व कुमारी खेळाडूंना या मैदानी निवड चाचणीकरिता पाचारण करून त्यातून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

mva press conference seat sharing for loksabha election 2024
सांगलीची जागा अखेर काँग्रेसनं सोडली; महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर, पाहा कोण कुठून निवडणूक लढवणार?
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’

प्रो कबड्डी लीगच्या प्रसारण हक्कांसाठी ई-लिलाव

प्रो कबड्डी लीगच्या आगामी पाच हंगामांसाठी प्रसारण हक्कांसाठीची ई-लिलाव प्रक्रिया ५ एप्रिल रोजी होणार आहे. मशाल स्पोर्ट्सतर्फे निविदा खरेदी करण्यासाठी १२ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सात हंगामांचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवरून करण्यात आले. त्यामुळे कबड्डी या देशी खेळाला जागतिक दर्जाच्या लीगद्वारे पुनरुज्जीवित करण्यात आले. प्रक्षेपणकर्त्यां कंपनीकडून अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी संघ व्यवस्थापनांकडून दडपण वाढल्यामुळे मशाल स्पोर्ट्सला हा निर्णय घ्यावा लागत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. आता २०२१ ते २०२५पर्यंतच्या आठ ते १२व्या हंगामासाठी प्रसारण हक्कांच्या निविदा जारी करण्यात आल्या आहेत. प्रक्षेपण, डिजिटल आणि गेमिंग अशा तीन प्रकारांचे स्वतंत्र अधिकार आणि एकत्रित अधिकार असा या निविदांचा उल्लेख करण्यात आला आहे.