उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत आरसीएफ, गुरुकुल तसेच महाराष्ट्र राज्य पोलिसांनी विजयी सलामी दिली.
पूर्णे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आरसीएफने नवी मुंबई पोलीस संघाचा ३४-३३ असा निसटता पराभव केला. आरसीएफकडून आनंद पाटील, अमर निवाते यांनी चांगला खेळ केला. चिपळूणच्या गुरुकुलने योगेश कांबळे, केदार सावंत व वैभव गुरव यांच्या चतुरस्र खेळामुळे ठाणे शहर पोलीस संघाला १६-१४ असे पराभूत केले.
महाराष्ट्र पोलिसांच्या संघाने सेंट्रल बँकेला ३१-२० असे पराभूत केले.