नवतरुण क्रीडा व सामाजिक विकास मंडळ कारावी यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत रायगडच्या सोनारसिद्ध, नवजीवन, ठाण्याचे शिवशंकर, ओम, कोल्हापूरचा शाहू सडवली, मुंबईच्या अंकुर, विजय स्पोर्ट्स, विजय नवनाथ या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या दिवसाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून विजय स्पोर्ट्सचा सिद्धार्थ पायनाईक याला गौरविण्यात आले.
मुंबईचा अंकुर स्पोर्ट्स क्लब व पुण्याचा ओमसाई क्रीडा मंडळ यांच्यात झालेला उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगतदार झाला. अंकुरने हा सामना ४ -३ असा जिंकला. ठाण्याच्या ओम क्रीडा मंडळाने ठाण्याच्याच उजाला संघावर ९ – ६ अशी मात केली. ओम संघाचे प्रशांत चव्हाण व शशांक हळदणकर चमकले. उजालाचा स्वप्निल पाटील छान खेळला.