मुंबई बंदर, बँक ऑफ बडोदा, न्यू इंडिया इन्शुरन्स, सेंट्रल बँक हे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शहरी व्यावसायिक पुरुषांत उपांत्य फेरीत धडकले. महिलांमध्ये बँक ऑफ बडोदा, ठाणे मनपा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण आणि एमरॉल्ड इन्फ्रास्ट्रक्चर यांनी उपांत्य फेरी गाठली.

शहरी व्यावसायिक पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या मुंबई बंदरने ठाणे मनपाचा ३६-२९ असा पराभव केला. सलील पाटील, शुभम कुंभार यांचा खेळ मुंबई बंदरच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. न्यू इंडियाने महाराष्ट्र बँकेचे आव्हान ३९-२३ असे संपवले. कुलदीप माईणकर, सुनील जाधव, राहुल शिरोडकर न्यू इंडियाकडून चांगले खेळले. गतउपविजेत्या बँक ऑफ बडोदाने रिझव्‍‌र्ह बँकेचा प्रतिकार ४२-१८ असा मोडून काढला. सिद्धार्थ पिंगे, नितीन देशमुख, जितेश पाटील विजयात चमकले. सेंट्रल बँकेने विद्युत वितरणचा प्रतिकार ३८-३४ असा मोडून काढला. ऋषिकेश गावडे, अमित जाधव, महालु गरुड यांचा खेळ सेंट्रल बॅँकेच्या विजयात मोलाचा ठरला. या विभागात मुंबई बंदर विरुद्ध न्यू इंडिया आणि बँक ऑफ बडोदा विरुद्ध सेंट्रल बँक अशा उपांत्य लढती होतील.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Sunil Gavaskar's reaction to Surya
MI vs RR : मुंबईला पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर ‘या’ गेम चेंजरची भासत आहे उणीव, माजी दिग्गज सुनील गावसकरांचे वक्तव्य
Kwena Maphaka has recorded embarrassing record in IPL 2024
IPL 2024 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप गाजवणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई; नावावर नोंदला गेला नकोसा विक्रम
Rashid Khan is 4 wickets away from creating history
IPL 2024 : मुंबईविरुद्ध राशिदला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! गुजरातसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरणार पहिला गोलंदाज

महिला गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत ठाणे मनपाने अमरहिंदचा ३७-१० असा पाडाव केला. मनपाकडून तेजस्वी पाटेकर, प्राजक्ता पुजारी, तेजस्विनी पोटे यांनी चमकदार कामगिरी केली. एमरॉल्डने नाशिकच्या रचना क्रीडा मंडळाचा ३९-०६ असा धुव्वा उडवला. सिद्धी चाळके, हर्षदा सोनावणे यांच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.