05 June 2020

News Flash

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : विजय बजरंग, डॉ. शिरोडकर यांची सलामी

‘ह’ गटात श्री राम संघाने मुंबई शहरच्या िपपळेश्वर संघावर १७-७ असा विजय मिळवला.

श्रमिक जिमखान्यावर सुरू असलेल्या स्पध्रेत गटवार साखळीत विजय बजरंग संघाने (‘ग’ गट) न्यू िहद विजय (चिपळूण) संघाचा २३-६ असा धुव्वा उडवला

शिवबा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शिवबा प्रतिष्ठान आमदार चषक २०१६’ राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत पुरुष गटात विजय बजरंग (मुंबई शहर), श्री राम संघ (पालघर), श्री हनुमान सेवा (कल्याण), तर महिला गटात शिवशक्ती (मुंबई शहर), महात्मा फुले (मुंबई उपनगर), डॉ. शिरोडकर क्लब (मुंबई शहर) आणि अमरिहद (मुंबई) संघांनी विजयी सलामी दिली.
श्रमिक जिमखान्यावर सुरू असलेल्या स्पध्रेत गटवार साखळीत विजय बजरंग संघाने (‘ग’ गट) न्यू िहद विजय (चिपळूण) संघाचा २३-६ असा धुव्वा उडवला. मध्यंतराला विजय संघाकडे केवळ एका गुणाची आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात प्रतिस्पध्र्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवत त्यांनी तब्बल १९ गुणांची कमाई केली. अक्षय उगाडेच्या प्रभावी चढाया विजय बजरंगच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
‘ह’ गटात श्री राम संघाने मुंबई शहरच्या िपपळेश्वर संघावर १७-७ असा विजय मिळवला. पहिल्या सत्रात िपपळेश्वर संघाकडे ६-४ अशी दोन गुणांची आघाडी होती. मात्र दुसऱ्या सत्रात त्यांना सातत्यपूर्ण खेळ करता आला नाही. जयदीप चौधरीच्या प्रभावी चढाया आणि नरेश धिंडलेच्या अचूक पकडींच्या जोरावर श्री राम संघाने सहज विजय मिळवला. तिसऱ्या लढतीत श्री हनुमान सेवा संघाने पाल्रे स्पोर्ट्स क्लबवर २७-२० अशी मात केली. समीर मालुसरे श्री हनुमानच्या विजयात चमकला.

महिलांच्या ‘ब’ गटात अमरिहद संघाने सिद्धी स्पोर्ट्स क्लबला ५३-१४ आणि ‘क’ गटात डॉ. शिरोडकरने श्री स्वामी समर्थला ५२-१२ अशा मोठय़ा फरकाने हरवले. अन्य लढतींमध्ये शिवशक्ती संघाने (‘अ’ गट) महर्षी दयानंद (मुंबई शहर) संघाचा ३८-१२ असा पराभव केला. ‘ड’ गटात महात्मा फुले संघाने ओम ज्ञानदीप संघाला २६-१७ असे हरवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2016 8:25 am

Web Title: state level kabaddi tournament
टॅग Kabaddi
Next Stories
1 आशियाई इन्डोअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : लांब उडीत प्रेमकुमारला रौप्य
2 महिला क्रिकेट स्पर्धा : भारताचा श्रीलंकेवर विजय
3 भारतीय महिला हॉकी संघाची आफ्रिकेशी बरोबरी
Just Now!
X