07 March 2021

News Flash

राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा : सुवर्णयुगची विजेतेपदावर मोहोर

पुण्याच्या सुवर्णयुग संघाने रणजीत राणे सामाजिक आणि क्रीडा मंडळ आयोजित प्रभाकर राणे स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत महिला गटात जेतेपदावर नाव कोरले. पुण्याच्याच राजमाता जिजाऊ संघावर

| December 3, 2012 12:25 pm

पुण्याच्या सुवर्णयुग संघाने रणजीत राणे सामाजिक आणि क्रीडा मंडळ आयोजित प्रभाकर राणे स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत महिला गटात जेतेपदावर नाव कोरले. पुण्याच्याच राजमाता जिजाऊ संघावर २३-२५ असा विजय मिळवत सुवर्णयुन संघाने राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. चुरशीच्या अंतिम लढतीत सुवर्णयुग संघ सुरुवातीला ११-१३ असा पिछाडीवर होता. शेवटच्या पाच मिनिटांत सुवर्णयुग संघाकडे २१-१८ अशी आघाडी होती. मात्र राजमाता संघाच्या स्नेहल शिंदेने एकाच डावात चढाई करून तीन गुण मिळवले.
त्यामुळे २२-२२ अशी बरोबरी झाली. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये आपला खेळ उंचावत सुवर्णयुगने जेतेपदाला गवसणी घातली. सुवर्णयुग संघातर्फे दीपिका जोसेफ आणि स्नेहल इंगळे यांनी सुरेख खेळ केला. राजमाता जिजाऊ संघाकडून स्नेहल शिंदे आणि पायल घोषारे यांनी कडवा प्रतिकार केला. पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एअर इंडियाने महिंद्र एण्ड महिंद्राचा ८-६ असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र पोलिस संघाने युनियन बँकेला १२-३ असे नमवले. अंतिम सामना एअर इंडिया आणि महाराष्ट्र पोलिस संघांमध्ये होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 12:25 pm

Web Title: state professional kabaddi competition swarnyug team won
टॅग : Kabaddi
Next Stories
1 रवींद्र जडेजाचा त्रिशतकांचा विक्रम
2 इंग्लंड संघाचा नेटमध्ये कसून सराव
3 बांगलादेशचा विक्रमी विजय
Just Now!
X