12 November 2019

News Flash

मुंबईची भक्ती, पुण्याचा हर्षवर्धन यांना लक्षवेधी खेळाडूचा पुरस्कार

कनिष्ठ गटात कोल्हापूरच्या यश साळोखेने ५१९ गुणांसह सुवर्णविजेती कामगिरी केली.

भक्ती खामकर व हर्षवर्धन यादव

राज्य अजिंक्यपद  नेमबाजी स्पर्धा

मुंबई : राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील रायफल नेमबाजी प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबई शहरच्या भक्ती खामकरची भीष्मराज बाम स्मृती सर्वाधिक लक्षवेधी खेळाडू पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५० मीटर रायफल प्रकारात तिने जबरदस्त कामगिरी करून दाखवली. पिस्तूल नेमबाजीत हाच पुरस्कार पुण्याच्या हर्षवर्धन यादवला मिळाला. त्याने २५ मीटर पिस्तूल प्रकारात दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ५० मीटर पिस्तूल प्रकारात नाशिकच्या सागर विधातेने ५४० गुणांसह सुवर्ण जिंकले. कनिष्ठ गटात कोल्हापूरच्या यश साळोखेने ५१९ गुणांसह सुवर्णविजेती कामगिरी केली.

निकाल

५० मीटर पिस्तूल (पुरुष) : १. सागर विधाते (नाशिक), २. सलमान खान पटेल (कोल्हापूर), ३. राजेंद्र बागूल (पुणे); ५० मीटर पिस्तूल (कनिष्ठ) : १. यश साळोखे (कोल्हापूर), २. सुयश पाटील (कोल्हापूर), ३. प्रदीप निघोते (पुणे)

First Published on October 22, 2019 3:04 am

Web Title: state shooting championship shooter bhakti khamkar harshvardhan get bal smruti award zws 70