07 April 2020

News Flash

पाकिस्तानला मागे टाकत ‘हा’ विक्रम भारतीय संघाच्या नावावर

रांचीतला विजय भारतासाठी ठरला फायदेशीर

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील एक संग्रहीत क्षण

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-२० सामना जिंकून भारतीय संघ क्रिकेटविश्वात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या आघाडीच्या तीन संघांमध्ये स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला मागे टाकत भारताने या यादीत तिसरं स्थान पटकावलं आहे. वन-डे, कसोटी आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत सर्वाधिक विजय मिळवत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ९८० तर इंग्लंडने ७४५ सामने जिंकले आहेत. रांचीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय हा भारताचा आंतराष्ट्रीय क्रिकेटमधला ६६६ वा विजय ठरला. पाकिस्तान ६६५ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात कर भारताने ५० टी-२० सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीतही आगेकूच केली आहे. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेनंतर ५० टी-२० सामने जिंकणारा भारत चौथा देश ठरला आहे. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी या यादीत मात्र भारतापेक्षा पुढे आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ६९ टी-२० सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ५७ तर श्रीलंकेने ५१ टी-२० सामने जिंकले आहेत.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या देशांची यादी –

१. ऑस्ट्रेलिया – १८०३ सामने – ९८० विजय

२. इंग्लंड – १७८३ सामने – ७४५ विजय

३. भारत – १५२६ सामने – ६६६ विजय

४. पाकिस्तान – १४०८ सामने – ६६५ विजय

५. वेस्ट इंडिज – १३८४ सामने – ५९२ विजय

६. दक्षिण आफ्रिका – १०९५ सामने – ५७० विजय

७. श्रीलंका – ११६३ सामने – ५०६ विजय

८. न्यूझीलंड – १२४७ सामने – ४६१ विजय

९. झिम्बाब्वे – ६४७ सामने – १५३ विजय

१०. बांगलादेश – ५०३ सामने – १३६ विजय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2017 6:15 pm

Web Title: stats india overtakes pakistan in most international cricket wins
टॅग Bcci,Pakistan,Pcb
Next Stories
1 नेहराला ट्रोल करणाऱ्या मिचेल जॉन्सनची नेटकऱ्यांकडून धुलाई
2 आयसीसीच्या नव्या नियमांमुळे धवन आणि फिंच संभ्रमात
3 २७ वर्षांची तपश्चर्या अखेर फळाला, फुटबॉल विश्वचषकासाठी इजिप्त पात्र
Just Now!
X