14 December 2019

News Flash

सोशल मीडियावर कोहलीने घातलं चाहत्यांना कोडं, तुम्हाला उत्तर माहिती आहे का?

कोहलीच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

बांगलादेश दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड गुरुवारी करण्यात येणार आहे. सध्या भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आपल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याची तयारी करतो आहे. यादरम्यान विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांसाठी एक कोडं टाकलं आहे.

विराटने महेंद्रसिंह धोनी आणि इतर सहकाऱ्यांसोबत टाकलेल्या फोटोमुळे पुन्हा एकदा धोनीच्या संघातील पुनरागमनाबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

२१ नोव्हेंबरला एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समिती आगामी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. प्रसाद आणि पूर्व विभागाचे प्रतिनिधी गगन खोडा यांनी आपला ४ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यामुळे गुरुवारची बैठक त्यांची अखेरची बैठक ठरु शकते. प्रसाद यांच्यानंतर माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन निवड समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

First Published on November 20, 2019 4:45 pm

Web Title: stealing doubles virat kohli tweets photo with partner in crime ms dhoni psd 91
टॅग Virat Kohli
Just Now!
X