विश्वचषकात ९ जून रोजी झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथची हुर्यो उडवली. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीला फरसा रूचला नाही आणि त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे या प्रकारासाठी कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी देखील मागितली होती. विराट कोहलीच्या या कृतीवर क्रिकेट विश्वात कौतूकही झाले. यावर स्मिथनंही आपली प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीच्या या कृतीला स्मिथने प्रशंसनीय काम असल्याचे पोचपावती दिली आहे.

गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरोधातील एका सामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्यामुळे स्मिथवर एका वर्षाची बंदी घातली होती. बंदीनंतर स्मिथनं यशस्वी पुनरागमन केले. मात्र, विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात दर्शक त्याची हुर्ये उडवताना दिसतेय. पण अखेर भारतीय कर्णधार विराट कोहलीनं स्मिथच्या पुनरगमनानंतर त्याच्या खेळाचा आंनद घ्या. त्यानं आता काही चुकीचं केलं नाही, त्यामुळे त्याची हुर्ये उडवण्यात काय अर्थ असे म्हणत स्मिथला धीर दिला. ‘खरे तर प्रेक्षक काय करतात याचा मला काही फरक पडत नाही, मी त्यांना दुर्लक्ष करतो. पण विराट कोहलीनं कौतुकास्पद काम केलं आहे’

(आणखी वाचा : ‘प्रेक्षकांनी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार कोहलीला नाही’, ब्रिटिश क्रिकेटपटूचे टिकास्त्र )

श्रीलंकेविरोधातील सामन्यानंतर बोलताना स्मिथ म्हणाला की, विराट कोहलीनं प्रेक्षकांच्या हुर्येला थांबवून कौतुकास्पद काम केलं आहे. प्रेक्षकांच्या अशा हुल्लडबाजीचा मला काही फरक पडत नसल्याचेही स्मिथ यावेळी म्हणाला.

९ जून रोजी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात विराट कोहली फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्मिथची प्रेक्षकांकडून हुर्यो उडवली जात होती. वर्ल्डकप सुरु झाल्यापासून स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना सातत्याने अशा घटनांचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार कर्णधार विराट कोहलीने आवडला नाही आणि त्याने थेट प्रेक्षकांना खडसावले. इतकंच नव्हे या प्रकारासाठी कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफी देखील मागितली. या कृतीसाठी जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी कोहलीचे कौतूक केले.