भारताकडून ट्वेन्टी-२० मालिकेत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचची उचलबांगडी करण्यात आली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी फिंचडून नेतृत्वाची धुवा स्टिव्हन स्मिथकडे सोपवण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्मिथकडेच आहे. या स्पर्धेसाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी मॅथ्यू व्ॉडकडून पीटर नेव्हिलकडे सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ : स्टिव्हन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, जेम्स फॉकनर, जॉन हॅस्टिंग्स, पीटर नेव्हिल, अ‍ॅडम झांपा, जोश हेझलवूड, आरोम फिंच, नॅथन कल्टर-निले, अ‍ॅश्टॉर अगर आणि अ‍ॅण्ड्रय़ू टाय.