News Flash

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व स्टिव्ह स्मिथकडे

मुख्य प्रशिक्षक अँड्रू मॅक्डोनाल्ड यांची माहिती

आयपीएलच्या आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी स्टिव्ह स्मिथचं पुनरागमन झालं आहे. राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्स संघात दिल्यामुळे राजस्थानचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस राजस्थानने स्टिव्ह स्मिथकडे आपल्या संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. राजस्थानचे प्रमुख प्रशिक्षक अँड्रू मॅक्डोनाल्ड यांनी IANS वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

बाराव्या हंगामाच्या अखेरीस राजस्थानने अजिंक्य रहाणेच्या हातातून नेतृत्व काढत स्मिथकडे नेतृत्व दिलं होतं. तेराव्या हंगामात अजिंक्य रहाणे दिल्लीच्या संघात गेल्यानंतर स्मिथची संघात कर्णधारपदावर वर्णी लागली आहे. “अजिंक्य रहाणे गेल्यानंतर स्टिव्ह स्मिथ हा एकमेव कर्णधारपदासाठी पर्याय आहे. मात्र आगामी हंगामासाठी संघात स्थैर्य गरजेचं आहे. खेळाडूंना नेमकं काय हवंय याची त्याला जाण आहे, तो अनुभवी आहे”, मॅक्डोनाल्ड यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली.

अजिंक्य रहाणेव्यतिरीक्त धवल कुलकर्णीही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. १९ डिसेंबरला आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव पार पडणार आहे, त्यावेळी संघ प्रशासन कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : ८ कोटी ४० लाखांची रक्कम मोजलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थानकडून डच्चू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 8:06 pm

Web Title: steve smith to lead rajasthan royals in ipl 2020 psd 91
टॅग : Ipl,Rr
Next Stories
1 IPL 2020 : सनराईजर्स हैदराबादचाही ५ खेळाडूंना घरचा रस्ता
2 IPL 2020 : मुंबई इंडियन्सकडून युवराज सिंहला बाहेरचा रस्ता
3 IPL 2020 : प्रमुख खेळाडू सोडणार कोलकाता नाईट रायडर्सची साथ
Just Now!
X