News Flash

वॉर्नच्या टीकेला वॉने फटकारले

ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नने केलेल्या टीकेला माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने फटकारले आहे.

| February 13, 2016 04:08 am

स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नने केलेल्या टीकेला माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने फटकारले आहे. वॉर्नच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे मी उचित समजत नाही. पण त्या वेळी मी माझे कर्तव्यच पार पाडले, असे वॉने स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी वॉर्नने स्टीव्ह वॉ हा सर्वात स्वार्थी क्रिकेटपटू होता, अशी टीका केली होती. यावर वॉ म्हणाला की, ‘‘कोणत्याही खेळाडूला वगळल्याचे सांगणे सोपे नसते. मी त्या सामन्यासाठी जसे वॉर्नला वगळल्याबाबत सांगितले तसे अन्य काही खेळाडूंशीही संवाद साधला होता. अ‍ॅडम डेल आणि ग्रेग ब्लेवेट यांनाही मी तुम्ही सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले होते. ते माझे कर्तव्यच होते. एक कर्णधार म्हणून तुम्हाला काही वेळा कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय संघाच्या भल्यासाठीच असतात.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2016 4:08 am

Web Title: steve waugh hits back at shane warne
Next Stories
1 पाटणाचा विजयी षटकार
2 फिफाच्या सरचिटणीसांवर १२ वर्षांची बंदी
3 भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
Just Now!
X