वेगवान गोलंदाज डेल स्टेनने गुरुवारी ४०० बळींचा टप्पा पूर्ण केला आणि जे पी डय़ुमिनीसोबत बांगलादेशच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशची ८ बाद २४६ अशी अवस्था झाली. स्टेन आणि डय़ुमिनी यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. बांगलादेशकडून फक्त मुशफिकर रहिमने (६५) अर्धशतक साकारले, तर महमदुल्लाहसोबत चौथ्या विकेटसाठी ९४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ४०० बळींचा टप्पा ओलांडणारा स्टेन हा द. आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2015 12:49 pm