९०च्या दशकात फायटिंग मशीन म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन पुन्हा एकदा WWE रिंगमध्ये फायटिंग करताना दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने WWE मधील पुनरागमनाबाबत माहिती दिली.

३० मार्च २००३ साली WWE रेसलमेनिया या स्पर्धेत त्याने रॉक विरोधात शेवटची फायटिंग केली होती. या सामन्यात त्याला रॉकने हरवले होते. त्यानंतर आता तब्बल १६ वर्षांनी तो WWE रिंगमध्ये दिसणार आहे.

रॉकबरोबर झालेल्या शेवटच्या सामन्यात स्टोन कोल्ड जबर जखमी झाला होता. त्याच्या पाठीच्या कण्याला व मानेला जोरदार मार बसला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला कुठल्याही प्रकारच्या फायटिंग स्पर्धेत भाग घेण्यास सक्त मनाई केली होती. परिणामी त्याने व्यवसायिक रेसलिंगमधून कायमची निवृत्ती घेतली. त्यावेळी स्टोन कोल्ड ३८ वर्षांचा होता. तसेच त्याच्या रेसलिंग कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. त्यामुळे कोणालाही त्याच्या निवृत्तीबाबत काही विशेष वाटले नाही. परंतु आता तब्बल १६ वर्षानंतर वयाच्या ५४व्या वर्षी स्टोन कोल्ड WWE मध्ये पुनरागमन करणार यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.