News Flash

“हारकर जितने वाले को…”, दीपक चहरच्या कामगिरीवर क्रिकेटपटूंनी दिल्या जबरदस्त प्रतिक्रिया

भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादने लंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाला टोमणाही मारला आहे.

दीपक चहर

दुसर्‍या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. दीपक चहरच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताने लंकेकडून विजयाचा घास हिरावला. दीपकने गोलंदाजीत दोन बळी घेत अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडवले. त्याच्या योगदानानंतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिल्या.

भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही टीम इंडियाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त करत दीपक चहरचेही कौतुक केले आहे. भारताचा माजी गोलंदाज वेंकटेश प्रसादने लंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाला टोमणाही मारला आहे. रणतुंगाने भारताच्या या संघाला ‘बी’ संघ असे म्हटले होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा – VIDEO : श्रीलंकेला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर भारताच्या खेळाडूंनी केलं ‘असं’ सेलिब्रेशन

दीपक चहरच्या आक्रमक फलंदाजीबाबत श्रीलंका दौर्‍यादरम्यान भारताचा उपकर्णधार असलेल्या भुवनेश्वर कुमारने मोठा खुलासा केला आहे. भुवनेश्वर कुमार म्हणाला की, दीपक चहरला फलंदाजीसाठी पाठवणे हा संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मास्टरस्ट्रोक होता. चहरला भुवनेश्वरच्या वर फलंदाजीसाठी पाठवले होते. सामनावीर पुरस्कार मिळालेल्या दीपक चहरने भुवनेश्वर कुमारबरोबर आठव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली. दीपक चहरने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत नाबाद ६९ धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमारही १९ धावांवर नाबाद राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 2:46 pm

Web Title: strong twiiter reactions about deepak chahars performancce against sri lanka adn 96
Next Stories
1 VIDEO : श्रीलंकेला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर भारताच्या खेळाडूंनी केलं ‘असं’ सेलिब्रेशन
2 VIDEO : शास्त्री मास्तरांच्या टीम इंडियानं पाहिली द्रविड सरांच्या टीम इंडियाची मॅच!
3 IND vs SL : सामना भारताने जिंकला, पण तब्बल ३०९३ चेंडूंनंतर भुवनेश्वर कुमारकडून झाली ‘ही’ चूक
Just Now!
X