10 August 2020

News Flash

स्टिरिया ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनला पहिले विजेतेपद

पहिल्याच फेरीदरम्यान (लॅप) फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल आणि चार्ल्स लेकरेक यांनी एकमेकांना धडक दिली.

स्टिरिया : शनिवारी ओलसर वातावरणात पार पडलेल्या पात्रता फेरीत अव्वल स्थान (पोल पोझिशन) पटकावल्यानंतर मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनने रविवारी मुख्य शर्यतीत पूर्णपणे वर्चस्व गाजवत स्टिरिया ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे विजेतेपद पटकावले. यंदाच्या मोसमातील हॅमिल्टनचे हे पहिले जेतेपद ठरले.

पहिल्याच फेरीदरम्यान (लॅप) फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल आणि चार्ल्स लेकरेक यांनी एकमेकांना धडक दिली. त्यामुळे वातावरण तापले असतानाच हॅमिल्टनने सुरुवातीपासून कारवर नियंत्रण राखत प्रतिस्पध्र्याना वरचढ होऊ दिले नाही. त्याचा सहकारी वाल्टेरी बोट्टास दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पण ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत बोट्टास अव्वल स्थानी असून हॅमिल्टन दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेड बुलच्या मॅक्स वेस्र्टापेन आणि अलेक्झांडर अल्बन यांनी या शर्यतीत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान प्राप्त केले. मॅकलॅरेनच्या लँडो नॉरिस याला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 12:19 am

Web Title: styrian grand prix lewis hamilton claims first win of title zws 70
Next Stories
1 पहिला मान पाहुण्यांचा! वेस्ट इंडिजचा यजमान इंग्लंडवर विजय
2 Video : आर्चरचा स्विंग अन् ब्रेथवेटची झाली दांडी गुल
3 ENG vs WI : करोनानंतरची पहिली कसोटी रंगतदार स्थितीत
Just Now!
X