15 December 2019

News Flash

असाही एक डेड बॉल

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या मदानावर  झालेल्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या शिव सिंगने स्वत:भोवती ३६० च्या कोनात फिरत गोलंदाजी केली

(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकिपटू शिव सिंगने २३ वर्षांखालील मुलांच्या सी.के. नायडू क्रिकेट स्पध्रेत बंगाल विरुद्ध खेळताना अजब गजब गोलंदाजी करत सर्वाचे लक्ष वेधले. शिव सिंगने चक्क ३६० अंशाच्या कोनात फिरत गोलंदाजी केली आणि फलंदाजाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशा प्रकारची गोलंदाजी केल्याप्रकरणी पंच विनोद शेषनने तो चेंडू ‘डेड बॉल’ घोषित केला.

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या मदानावर  झालेल्या सामन्यात उत्तर प्रदेशच्या शिव सिंगने स्वत:भोवती ३६० च्या कोनात फिरत गोलंदाजी केली. हा प्रकार लक्षात येताच पंच विनोद यांनी तो डेड बॉल ठरवला. बंगालचे दोन्ही फलंदाज तगडय़ा भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत होते. त्यांची जोडी फोडण्यासाठी अनेक गोलंदाजांनी प्रयत्न केले मात्र, यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग करण्यासाठी शिव सिंगने आपल्या षटकांत अनोखा प्रयोग केला. शिव सिंगने स्वत:भोवती फिरत ३६० च्या कोनात चेंडू टाकला. मात्र हा चेंडू पंचाने डेड बॉल ठरवला. आपल्या बद्दल स्पष्टीकरण देताना शिव सिंग म्हणाले गोलंदाजी मध्ये विविध प्रयोग मी करत असतो. त्यामुळे हा देखील एक प्रयोग होता मात्र, त्याला डेड बॉल देण्यात आला. यापूर्वी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पध्रेत मी केरळ विरुद्ध असाच ३६० च्या कोनात चेंडू फेकला होता, त्यावेळी मात्र पंचांनी त्याला डेड बॉल ठरवला नव्हता, असेही सिंग म्हणाला.

First Published on November 9, 2018 12:14 am

Web Title: such as a dead ball
Just Now!
X