नवव्यांदा पटकावला ‘मि. इंडिया’चा किताब
पीळदार आणि भारदस्त शरीरसंपन्नतेच्या जोरावर महाराष्ट्राच्या सुहास खामकरने नवव्यांदा ‘मि. इंडिया’ या किताबाला गवसणी घालत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. तामिळनाडू बॉडी बिल्डिंग संघटनेतर्फे आयोजित ५३व्या मिस्टर इंडिया स्पर्धेत सुहास खामकरने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या संघाने सर्वसाधारण जेतेपदावरही कब्जा केला.
महिलांमध्ये आठव्या फिटनेस अजिंक्यपदाचा मान पश्चिम बंगालच्या दीप्रींना भट्टाचारीने मिळवला. पश्चिम बंगालने सर्वसाधारण जेतेपद पटकावले. महाराष्ट्रातील दुर्गा जाधव आणि विद्या श्रीसत्र या दोघींनी रौप्यपदक मिळवले.
गटवार निकाल पुढीलप्रमाणे :
५५ किलो : सुनील सपकाळ, सोनू, रोशन तटकरे, भारत जाधव, पी. पेरवाल.
६० किलो : जयसिंग, करणजीतसिंह, अजू घोष, संजीवकुमार.
६५ किलो : एम. कोठनदर्शन, हरिराम, अशोककुमार, इम्रान मेवेकरी, संजय श्रीव्हास.
७० किलो : रविकुमार, विजय मोरे, अंबर शर्मा, सचिन पाटील, के. अरुणाचलम.
 ७५ किलो : आशीष साखरकर, अब्दुल अश्रप, मनजीत शकुन, सचिन वाय. पाटील, जय दाभाडे.
 ८० किलो : सुहास खामकर, एन. जी. रणधीर, प्रणय लोंढे, पवनकुमार, टी. शिवशंकर.
 ८५ किलो : ब्रोव्हन युमनाम, तेजिंदरसिंग, अमीन चौधरी, सकुमार, महेशराव.