04 August 2020

News Flash

सुहास सातवे आसमाँ पर..

आपल्या पीळदार आणि आखीव, रेखीव शरीरसंपदेच्या जोरावर सुहास खामकरने सातव्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’ या किताबाला गवसणी घातली. महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने पहिल्यांदाच लोणावळ्यामध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली

| April 23, 2013 03:40 am

आपल्या पीळदार आणि आखीव, रेखीव शरीरसंपदेच्या जोरावर सुहास खामकरने सातव्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’ या किताबाला गवसणी घातली. महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने पहिल्यांदाच लोणावळ्यामध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत मुबंईच्या सुहासला मुंबईच्याच आशीष साखरकर आणि पिंपरी-चिंचवडच्या महेंद्र पगडे यांची कडवी स्पर्धा होती. पण या तिघांच्या तुलनेच्या वेळी सुहासने आपल्या कोरीव शरीरसौष्ठवाचे प्रभावीपणे प्रदर्शन करत बाजी मारली. सुहासला यावेळी १ लाख ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी सर्वोत्तम पोझरचा पुरस्कार पुण्याच्या अजित थोपटेने, प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटूचा पुरस्कार जळगावच्या सचिन पाटीलने मिळवला. या स्पर्धेतील ‘मिस-महाराष्ट्र’ हा पुरस्कार नाशिकच्या स्टेफी मंडलने पटकावला.
महाराष्ट्र श्री स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
५५ किलो- १) सुनील सकपाळ (मुंबई) (२) रोशन तटकरे (प.ठाणे) (३) भरत जाधव  (पुणे).
६० किलो- १) जय सिंग (अहमदनगर) (२) रामा मायनाक (सातारा) (३) अमर फरांदे (सातारा).
६५ किलो- १) अजित थोपटे (पुणे) (२) विजय जाधव (ठाणे) (३) फैयाज शेख (सातारा).
७० किलो- १) विजय मोरे (कोल्हापूर) (२) इम्रान मेवेकरी (पुणे) (३) गणेश गोसालीया (औरंगाबाद).
७५ किलो-  सचिन पाटील (जळगाव) (२) सचिन पाटील (ठाणे) (३) जय दाभाडे (पिंपरी चिंचवड).
८० किलो- १) आशिष साखरकर (मुंबई) (२) प्रणय लोंढे (पिंपरी चिंचवड) (३) दुर्गाप्रसाद दासरी (कोल्हापूर).
८५ किलो- १) सुहास खामकर (मुंबई) (२) महेश राव (ठाणे) (३) गोपाळ थापा (पिंपरी चिंचवड).
८५ किलोवरील- १) महेंद्र पगडे (पिंपरी चिंचवड) (२) प्रशांत साळुंखे (मुंबई) (३) अविनाश इंगळे (पुणे).
उत्कृष्ट पोजर- अजित थोपटे (पुणे).
प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटू- सचिन पाटील (जळगाव).
मिस महाराष्ट्र (खुला गट) महिलांच्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
१) स्टेफी मंडल (नाशिक) (२) विद्या सिरस (पुणे) (३) आशा थापा (नाशिक) (४) पुनम सुतार (कोल्हापूर) (५) सिद्धी शिंदे (कोल्हापूर).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2013 3:40 am

Web Title: suhas khamkar seventh time maharashtra shree
टॅग Sports,Suhas Khamkar
Next Stories
1 आनंदला अ‍ॅडम्सकडून पराभवाचा धक्का
2 बार्सिलोनाविरुद्धच्या अग्निपरीक्षेसाठी बायर्न म्युनिच सज्ज
3 ..तर विश्वविजेतेपदाच्या लढतीतून कार्लसनची माघार
Just Now!
X