22 September 2020

News Flash

छेत्रीच्या विक्रमाला पराभवाची किनार!

कुराकाओची भारतावर ३-१ अशी मात

कुराकाओची भारतावर ३-१ अशी मात

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने बुधवारी भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. मात्र कुराकाओ संघाने किंग चषक फुटबॉल स्पर्धेत भारताला ३-१ अशी धूळ चारून छेत्रीसह भारतीय चाहत्यांच्या आनंदावर विरजण घातले.

भारताचे प्रशिक्षक म्हणून इगॉर स्टिमॅच यांचा हा पहिलाच सामना होता, तर ३४ वर्षीय छेत्रीने १०८व्या सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना बाइच्युंग भुतियाचा १०७ सामन्यांचा विक्रम मोडीत काढला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जागतिक फुटबॉल क्रमवारीत ८२व्या स्थानी असलेल्या कुराकाओ संघाने भारतीय बचावपटूंवर दडपण आणले. रोली बोनेव्हॅसिआ (१६वे मिनिट), एल्सन होई (१८) यांनी तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल झळकावून भारताला पिछाडीवर टाकले.

मात्र विक्रमी सामना खेळणाऱ्या छेत्रीने ३१व्या मिनिटाला स्पॉट किकद्वारे गोल करून भारताची पिछाडी १-२ अशी कमी केली. छेत्रीचा हा कारकीर्दीतील ६८वा गोल ठरला. परंतु या गोलचा आनंद फक्त क्षणांपुरताच उरला. कारण ३३व्या मिनिटाला ल्रेडों बाकुनाने कुराकाओसाठी तिसरा गोल नोंदवून संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिले.

वैयक्तिक विक्रमापेक्षा संघाला सामना जिंकवून देण्यात माझा गोल उपयोगी ठरला असता तर मला अधिक आनंद झाला असता. तांत्रिकदृष्टय़ा सक्षम संघाविरुद्ध पहिल्याच सत्रात तीन गोल बहाल केल्यानंतर तुम्हाला पुनरागमन करण्याची संधी क्वचितच मिळते.    – सुनील छेत्री, भारताचा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 8:02 am

Web Title: sunil chhetri 2019 kings cup
Next Stories
1 Cricket World Cup 2019 : भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ला मागे टाकत रोहित शर्माचा भीमपराक्रम !
2 World Cup 2019 : युजवेंद्र चहल विश्वचषक इतिहासातला भारताचा सर्वोत्तम गोलंदाज
3 Cricket World Cup 2019 : अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंड विजयी, बांगलादेशची झुंज अपयशी
Just Now!
X