News Flash

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला सुनील छेत्रीचा आणखी अभिमान वाटेल…

भारत-केनिया सामन्यानंतर एका चाहत्याने सुनील छेत्रीच्या दिशेने तिरंगा भिरकावला. त्यानंतर सुनीलने काय केले ते पाहून तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल.

भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा आपल्या विनम्र स्वभावासाठी ओळखला जातो. क्रिकेटप्रमाणेच फुटबॉलसारख्या खेळांनाही भारतीयांनी पसंती द्यावी, असे त्याने भारत विरुद्ध केनिया सामन्याआधी विनम्रपणे आवाहन केले होते. या सामन्याला प्रेक्षक आणि चाहते दोघांनी जोरदार प्रतिसाद दिला. तिकिटेही पूर्णपणे विकली गेली. या सामन्यासाठी आलेल्या सुनील छेत्रीनेदेखील केनियाविरुद्धचा सामना जिंकून भारतीयांना एक सुखद धक्का दिला.

हा सामना भारताने ३-० असा जिंकला. कर्णधार सुनील छेत्रीने त्या सामन्यात २ गोल केले आणि उत्तम खेळ केला. या सामन्यानंतर सुनील छेत्रीच्या बाबतीत अशी गोष्ट घडली की त्यामुळे लोकांना त्याचा अधिक अभिमान वाटू लागला आहे. केनियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सुनील आपल्या रक्षकांबरोबर स्टेडियममधून ड्रेसिंग रूमकडे चालला होता. त्यावेळी हा किस्सा घडला.

सुनील चालत असताना त्याच्या आजूबाजूला त्याचे अंगरक्षक आणि स्टेडियममधील कर्मचारी होते. तो ड्रेसिंग रूमकडे जाताना चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला. आणि त्यापैकी एका चाहत्याने भारताचा छोट्या आकाराचा झेंडा सुनीलच्या दिशेने टाकला. या तिरंग्यावर सुनीलने सही करावी, अशी त्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र सुनिलचे त्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे तो तिरंगा जमिनीवर पडला आणि त्याच्या अंगरक्षक आणि कर्मचाऱ्यांपैकी एकाच त्याच्यावर चुकून पाय पडला.

आजूबाजूला प्रचंड गोंधळ सुरु असूनही सुनीलला हि गोष्ट पटकन दिसून आली आणि त्याने स्वतः थांबत तो झेंडा उचलण्याचा प्रयत्न केला. तितक्यात एकला कर्मचाऱ्याने तो झेंडा उचलला. त्यानंतर सुनीलने ज्या कर्मचाऱ्याने य्त्या झेंड्यावर चुकून पाय दिला होता, त्याला सुनीलने खडसावले. आणि चाहत्यांची नम्रपणे माफी मागून तो आत निघून गेला. तसेच, मी तुम्हाला नंतर भेटेन, असेही चाहत्यांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 4:43 pm

Web Title: sunil chhetri football vs kenya indian flag
टॅग : Football,Sunil Chhetri
Next Stories
1 ‘आयपीएल’मधील मिस्ट्री गर्ल पुन्हा चर्चेत; म्हणते …
2 चिंता नको, माझ्या गर्लफ्रेंडला राणीसारखं वागवेन, लोकांपासून लपवणार नाही – लोकेश राहुल
3 Video : ‘गेल डन!’; नेमबाजीतही गेल सरस… हा व्हिडीओ पाहाच
Just Now!
X