News Flash

सुनील छेत्रीचा ‘डबल धमाका’, मेसीच्या विक्रमाशी केली बरोबरी

भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

सुनील छेत्रीचा ‘डबल धमाका’, मेसीच्या विक्रमाशी केली बरोबरी

भारताच्या फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. त्याने सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रीय फुटबॉल  खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने याबाबतीत फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू आणि अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी याची बरोबरी केली. छेत्रीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव केला आणि इंटरकॉन्टिनेंटल चषकावर नाव कोरलं.

मेसी आणि छेत्री या दोन्ही दिग्गज फुटबॉलपटूंच्या नावावर प्रत्येकी 64 गोलची नोंद झाली आहे. देशासाठी सर्वाधिक गोल करणा-यांच्या एकूण क्रमवारीत मेस्सी व छेत्री संयुक्तपणे 21व्या स्थानी आहेत. तर त्यांच्यापुढे म्हणजेच अव्वल स्थानी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याने 150 सामन्यांतून 81 गोल केले आहेत.

इंटरकॉन्टिनेंटल चषकातील चार सामन्यात भारताचे एकूण 11 गोल झाले त्यापैकी 8 गोल एकट्या छेत्रीने केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 9:43 am

Web Title: sunil chhetri joins lionel messi as the second highest active goal scorer in the world
Next Stories
1 भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करण्याच्या तयारीत मोहम्मद शमी, पत्नीचा नवा आरोप
2 खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षकाची गरज!
3 हिरो काँटिनेंटल फुटबॉल कप: केनियाचा धुव्वा उडवत भारताचे जेतेपद, छेत्रीचे २ गोल
Just Now!
X