News Flash

Video: जेव्हा सुनिल गावसकरही म्हणतात, ‘मैं नागिन डान्स नचना…’

मुशफिकुर रहमानने श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर नागिन डान्स केला होता

सुनील गावसकर

निदहास ट्रॉफीच्या भारत आणि बांगलादेश अंतिम सामन्यातील दिनेश कार्तिकच्या खेळीची जेवढी चर्चा होत आहे, तेवढीच चर्चा अजून एका मजेशीर क्षणाचीही होत आहे. त्याचे झाले असे की, या टी२० मालिकेत बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुशफिकुर रहमान याने श्रीलंकेविरोधातील एका सामन्यात नागिन डान्स केला होता. हा नागिन डान्स एवढा प्रसिद्ध झाला की, त्यानंतरच्या होणाऱ्या प्रत्येक सामन्यात नागिन डान्स करणं हे जणू महत्त्वाचेच झाले. खेळाडूंसोबतच प्रेक्षकही हा डान्स करु लागले होते. आता सर्वांवरच नागिन डान्सची झिंग चढली म्हटल्यावर समालोचक तरी कसे शांत बसतील ना…

भारत- बांगलादेश अंतिम सामन्यादरम्यान क्रिकेटर आणि समालोचक सुनिल गावसकर यांनीही असाच काहीसा नागिन डान्स केला आणि साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिली फलंदाजी करत २० षटकात १६६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन केवळ १० धावा करुन बाद झाला. पण रोहित शर्माने लोकेश राहुलच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

रोहितची फलंदाजी पाहून सुनील गावसकर यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये नागिन डान्स करायला सुरूवात केली. टीव्हीवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही गावसकरांचा हा नागिन डान्स दाखवण्यात आला. ज्यावेळी गावसकर हा डान्स करत होते, तेव्हा रुबैल हुसैन गोलंदाजी करत होता आणि रोहित त्याच्या गोलंदाजीवर चौकार षटकार लगावत होता. हुसैनने सुरेश रैनाला बाद करुन भारतीय फलंदाजी याआधीच कमकूवत केली होती. पण रोहितने योग्य खेळी खेळत टीम इंडियावरचा धावांचा दबाव कमी केला. रोहितची ही खेळी पाहूनच गावसकर स्वतःला नागिन डान्स करण्यावाचून रोखू शकले नाही. रोहितने भारतासाठी ५६ धावांची खेळी केली.

मुशफिकुर रहमानने श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर नागिन डान्स केला होता. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मुशफिकुरचा झेल पकडल्यानंतर अमिला अपोंसोने नागिन डान्स केला होता. अमिलाचा हा डान्स पाहून प्रेक्षकांनीही तो डान्स करायला सुरूवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 11:02 am

Web Title: sunil gavaskar india vs bangladesh nidahas trophy 2018 final rohit sharma nagin dance
Next Stories
1 VIDEO : लंकन फॅन्सने नागिन डान्स करुन बांगलादेशच्या कर्णधाराला डिवचलं
2 Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??
3 जाणून घ्या दिनेश कार्तिक सामन्याआधी काय म्हणाला होता…
Just Now!
X