पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघासमोर आता नवीन अडचण निर्माण झाली आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना हाताला बॉल लागल्यामुळे मोहम्मद शमीला दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाहीये. त्यातच कर्णधार विराट कोहलीनेही भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघनिवड करताना भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी शमीच्या जागेवर इशांत शर्माला संधी देण्याची मागणी केली आहे.

पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शमीच्या हाताला दुखापत

 

“शमीची दुखापत ही भारतासाठी खूप मोठी समस्या आहे. तो विकेट मिळवण्यात पारंगत आहे. बाऊन्सर आणि यॉर्कर चेंडूंनी तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना जाळ्यात अडकवू शकतो. तो खेळणार नसेल तर भारतीय संघासमोर मोठी अडचण निर्माण होईल. जर इशांत शर्मा आता फिट असेल तर मी सल्ला देईन की मॅनेजमेंटने त्याला ताबडतोक ऑस्ट्रेलियात पाठवावं. तो दिवसाला २० षटकं टाकू शकणार असेल तर त्याला मॅनेजमेंटने तात्काळ विमानात बसवून ऑस्ट्रेलियात पाठवावं म्हणजे तो सिडनी कसोटीपर्यंत तयार होऊ शकतो.” India Today शी बोलताना गावसकरांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – टीम इंडियाच्या मदतीसाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियात पाठवा !

शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला योग्य पर्याय मिळणं गरजेचं असल्याचंही गावसकर म्हणाले. “नवदीप सैनी चांगली गोलंदाजी करतो, त्याला विकेटही मिळतात परंतू सराव सामन्यात त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ते पाहता तो सध्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणेल असं वाटत नाही.” या मालिकेतला दुसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – India tour of Australia 2020 : साहा, पृथ्वीला वगळणार?