भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा धुव्वा उडवला. इंग्लंडच्या संघाला दोन्ही डावात मिळून २०० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. सामना संपल्यानंतर फिरकीला पोषक असणारी खेळपट्टी टीकेचं लक्ष्य ठरली. काही खेळाडूंनी खेळपट्टी योग्य असून फलंदाजीचा दर्जा घसरल्याचं मत व्यक्त केलं. तर काहींनी खेळपट्टी कसोटी सामन्याला योग्य नव्हती असं मत व्यक्त केलं. हा वाद ऐन रंगात असताना ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत महत्त्वाचं मत मांडलं.

Ind vs Eng: “भारताने सामना जिंकला, पण…”; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मत

” खेळपट्टीला दोष देणाऱ्यांनी इंग्लंडच्या फलंदाजांची देहबोली कशी होती याचाही विचार करायला हवा. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे पाहिलं तर ते खूपच विश्वासाने मैदानात उतरले होते. आपल्या कुटुंबाला समुद्रकिनाऱ्याची सफर करायला घेऊन जावं इतक्या सहजतेने रोहित फलंदाजी करत होता. तर एखाद्या भुरट्या चोराला बेड्या ठोकण्याच्या उद्देशाने जावं तसा विश्वास विराटच्या फलंदाजीतून जाणवत होता. याउलट इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था मात्र बरणीतून बिस्कीट चोरताना हात अडकलेल्या लहान मुलासारखी झाली होती. केवळ जो रूट फलंदाजीसाठी प्रसन्न मनाने आला. इतर सारेच खेळाडू कंटाळवाण्या पद्धतीने फलंदाजी करून गेले”, अशा शब्दात गावसकरांनी इंग्लंडच्या फलंदाजांच्या देहबोलीचं वर्णन केलं.

Ind vs Eng: इंग्लंडच्या फलंदाजांची अवस्था भित्र्या सश्यासारखी!

खेळपट्टीच्या वादावर…

“जग हे साऱ्यांसाठी मुक्त आहे. कोणीही काहीही मत व्यक्त करू शकतं. प्रत्येकाला अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य आहे. तुम्ही विविध खेळाडूंनी खेळपट्टीवर केलेली टीका नीट पाहिलीत तर तुम्हाला लक्षात येईल की काही खेळाडूंनी खेळपट्टीबद्दल अत्यंतिक मत व्यक्त केलं आहे. इंग्लंडचे महान खेळाडू जेफरी बॉयकॉट, नासिर हुसेन आणि माइक अर्थरटर्न या तिघांनी खेळपट्टीबद्दल एकांगी मत व्यक्त केलेलं नाही. त्यांनी नीट मुद्देसूद विश्लेषण करून दाखवलं आहे. त्यामुळे अतिशयोक्ती करणाऱ्यांच्या मतांकडे लक्ष देण्याची फारशी गरज नाही”, असं मत गावसकरांनी व्यक्त केलं.