11 August 2020

News Flash

सचिन-द्रविड-लक्ष्मण कणखर नव्हते का?

सुनील गावस्कर यांचा नासिर हुसेनला सवाल

सुनील गावस्कर यांचा नासिर हुसेनला सवाल

मेलबर्न : सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारखे खेळाडू कणखर नव्हते का, असा सवाल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनला केला आहे.

भारताचा माजी कर्णधार गांगुलीचा काही दिवसांपूर्वीच ४८वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने हुसेन यांनी एका क्रीडा वाहिनीवर गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाची तुलना त्यापूर्वीच्या भारतीय संघांशी केली.

‘‘गांगुलीकडे नेतृत्व दिल्यापासून भारतीय संघाचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला. तो स्वत: एक आक्रमक आणि जिद्दी खेळाडू होता. त्याच्या संघातील हरभजन सिंग, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग हे खेळाडूसुद्धा त्याच्याप्रमाणेच होते. त्यामुळे त्या भारतीय संघाविरुद्ध खेळताना खरा कस लागायचा. त्यापूर्वीच्या भारतीय संघात अनेक कौशल्यवान क्रिकेटपटू होते. मात्र ते अतिशय शांत स्वरूपाचे होते. त्यांच्याविरुद्ध खेळताना स्पर्धात्मक वातावरण कमी असायचे,’’ असे हुसेन म्हणाला होता. त्यामुळे गावसकर यांनी हुसेनवर ताशेरे ओढले आहेत.

‘‘हुसेनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला १९९०मध्ये सुरुवात झाली. त्यामुळे १९७०-९०च्या काळातील भारतीय संघाबाबत तो कशी काय प्रतिक्रिया देऊ शकतो. गांगुली हा नक्कीच भारताचा एक सर्वोत्तम कर्णधार होता. परंतु ७०-८०च्या दशकातील संघानेसुद्धा विदेशी दौऱ्यावर जाऊन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्याशिवाय विश्वचषकावरही नाव कोरले,’’ असे गावसकर म्हणाले.

‘‘गांगुलीने नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी तसेच कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतरही त्याच्या संघात सचिन, द्रविड आणि लक्ष्मण असे शिस्तप्रिय खेळाडू होते. त्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध आक्रमक न होता त्यांना सन्मान दिला, म्हणून त्यांना बचावात्मक ठरवावे का,’’ असा सवालही गावसकर यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 1:54 am

Web Title: sunil gavaskar slams former england captain nasser hussain for his india nice side comment zws 70
Next Stories
1 दोन आठवडय़ांचा विलगीकरणाचा काळ खेळाडूंसाठी निराशाजनक!
2 ला लिगा फुटबॉल : बार्सिलोनाची चिवट झुंज सुरूच
3 मुंबईतील हॉकी रसातळाला जाण्याच्या मार्गावर!
Just Now!
X