18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

ट्रॉटवर गावस्करचे टीकास्त्र

भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्करने शुक्रवारी इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटवर टीका केली. पहिल्या कसोटी सामन्याच्या

अहमदाबाद : | Updated: November 17, 2012 2:13 AM

भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्करने शुक्रवारी इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटवर टीका केली. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी योग्य पद्धतीने झेल घेतला नसतानाही दावा करणाऱ्या ट्रॉटने क्रिकेट खेळामधील सद्भावनेचा भंग केला आहे, अशा शब्दांत गावस्करने टीका केली.
पहिल्या दिवशी पहिल्या स्पिलमध्ये विराट कोहलीचा आपण झेल घेतल्याचा दावा ट्रॉटने केला. परंतु टीव्ही रिप्लेमध्ये हा झेल नसल्याचे स्पष्ट झाले. ‘‘क्रिकेटमधील सद्भावनेचा भंग झाल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. इंग्लिश प्रसारमाध्यमे याबाबत काय लिहितील, हे मला माहीत नाही. पण ट्रॉटवर कारवाई व्हायला हवी, असे माझे मत आहे’’, असे गावस्करने सांगितले.    

First Published on November 17, 2012 2:13 am

Web Title: sunil gaveskar criticise jonathan trott
टॅग Sunil Gaveskar