19 October 2018

News Flash

सुनील साळुंखे ‘हिंद केसरी’

सोलापूरजवळच्या सांगोला तालुक्यातील बामणी गावातील सुनील साळुंखेने ‘हिंद केसरी’ किताबावर नाव कोरत ऐतिहासिक विजय मिळवला.

| February 2, 2015 01:08 am

सोलापूरजवळच्या सांगोला तालुक्यातील बामणी गावातील सुनील साळुंखेने ‘हिंद केसरी’ किताबावर नाव कोरत ऐतिहासिक विजय मिळवला. कर्नाटकमधील जमखंडी येथे आयोजित भारतीय कुस्ती संघटनेची मान्यता असलेल्या या कुस्ती स्पर्धेत सुनीलने महाराष्ट्राचा झेंडा फडकावला.
अंतिम लढतीत सुनीलने पंजाबच्या हितेश कुमारला ९-७ असे चीतपट करत हिंदकेसरी किताबावर नाव कोरले. अंतिम फेरीपर्यंतच्या चार लढतीत सुनीलने हरयाणाच्या रामपाल, महाराष्ट्राच्या विक्रम शिंदे, जम्मू आणि काश्मीरच्या सुरिंदर सिंग यांना चीतपट करत अंतिम फेरी गाठली. प्राथमिक फेऱ्यांमधील कामगिरी अंतिम लढतीत कायम राखत सुनीलने दिमाखदार विजय साकारला.
 

First Published on February 2, 2015 1:08 am

Web Title: sunil salunkhe gets hind kesari trophy
टॅग Hind Kesari