05 July 2020

News Flash

सनरायझर्स हैदराबादची विजयी बोहनी

डावखुरा गोलंदाज बरींदर सरणच्या अचूक माऱ्याने मुंबई इंडियन्सचा धावांचा ओघ आटवला.

| April 19, 2016 06:19 am

सामनावीर : डेव्हिड वॉर्नर.

कर्णधार डेव्हिड वॉर्नरने केलेल्या चिवट खेळाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबई इंडियन्सने ठवेलेल्या १४२ धावांचे लक्ष्य हैदराबादने ७ विकेट्स राखून सहज पार केले.
डावखुरा गोलंदाज बरींदर सरणच्या अचूक माऱ्याने मुंबई इंडियन्सचा धावांचा ओघ आटवला. सरणने तीन विकेट्स घेत गतविजेत्या मुंबईला निर्धारित २० षटकांत ६ बाद १४२ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आयपीएलचा पहिलाच सामना खेळणारा न्यूझीलंडचा मार्टिन गप्तिलला पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने माघारी धाडले. त्यापाठोपाठ पार्थिव पटेलही परतला. अंबाती रायडू आणि रोहित शर्मा यांनी काही काळ मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरटी धाव घेण्याच्या नादात रोहित धावबाद झाला. जोस बटलरही अपयशी ठरला. मात्र, रायडूने एका बाजूने खेळपट्टीवर जम बसवला होता. त्याने कृणाल पांडय़ासह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रायडूने ४९ चेंडूत ३ चौकार व २ षटकार खेचून ५४ धावांची खेळी केली. हैदराबादचा कर्णधार शिखर धवनने कृणालला दिलेला जीवदान मुंबईच्या पथ्यावर पडला. कृणालने २८ चेंडूंत ३ चौकार व तितक्याच षटकारांची आतषबाजी करून नाबाद ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर मुंबईने १४२ धावांपर्यंत मजल मारली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मशी झगडणाऱ्या शिखर धवनला (२) पुन्हा अपयश आले. टीम साऊदीने त्याला त्रिफळाचीत केले. मात्र, वॉर्नरने धडाकेबाज फलंदाजी करत हैदराबादचा विजय निश्चित केला., त्याने ५९ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकार लगावून नाबाद ९० धावांची खेळी केली. मोईसेस हेन्रिक्स (२०), इयॉन मॉर्गन (११) आणि दीपक हुडा (नाबाद १७) यांनी छोटेखानी खेळी करून त्याला उत्तम साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : ६ बाद १४२ (अंबाती रायडू ५४, कृणाल पांडय़ा नाबाद ४९; बरींदर सरण ३-२८) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १७.३ षटकांत ३ बाद १४५ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ९०, मोईसेस हेन्रिक्स २०; टीम साऊदी ३-२४).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2016 6:19 am

Web Title: sunrisers hyderabad beat mumbai indians by 7
Next Stories
1 दडपण हाताळण्यात धोनीच सर्वोत्तम कर्णधार -नेहरा
2 दीपाची ऑलिम्पिक भरारी
3 इतिहास रचण्याची सुवर्णसंधी – मराठे
Just Now!
X