26 November 2020

News Flash

आता वन डेतही सुपर ओव्हर!

सुपर ओव्हरची संधी देऊन विजेता ठरविण्यात यावा, अशी सोय

India are the reigning Champions Trophy winners (Getty )

ट्वेन्टी-२० सारख्या झटपट क्रिकेट सामन्यात टाय झाल्यास आयसीसीचा ‘सुपर ओव्हर’चा थरार आता वन डेतही अनुभवता येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत यंदा सुपर ओव्हर खेळविण्यात येणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामन्यासाठी सुपर ओव्हरचा पर्याय उपलब्ध असल्याचे आयसीसीने जाहीर केल्याचे वृत्त ‘क्रिकेट डॉटकॉम एयू’ने दिले आहे. दुबईमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेसाठीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून उपांत्य आणि अंतिम फेरीत सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळविण्यासाठीची मान्यता आयसीसीने दिली आहे.
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये याआधी केवळ अंतिम फेरीतच सुपर ओव्हरचा पर्याय उपलब्ध होता. बाद फेरीत सुपर ओव्हरचा नियम लागू करण्यात आला नव्हता. यावेळेस स्पर्धेच्या अंतिम फेरीसोबतच उपांत्य फेरीतील सामन्यातही सुपर ओव्हर खेळविण्यात येईल, असे आयसीसीने ठरविले आहे. पण वन डेमध्ये आजवर एकदाही सुपर ओव्हर खेळविण्यात आलेली नाही.

 

उपांत्य फेरीतील सामने देखील चुरशीचे होतात. त्यामुळे उपांत्य फेरीत सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरची संधी देऊन विजेता ठरविण्यात यावा, अशी सोय करण्यात येणार नाही. यंदा होणाऱया महिला क्रिकेटच्या वन डे विश्वचषक स्पर्धेतही उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी सुपर ओव्हर खेळविण्याची मान्यता देण्यात आल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. महिला क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा यंदा इंग्लंडमध्ये खेळविण्यात येणार आहे. याशिवाय, महिला विश्वचषक स्पर्धेसाठी डीआरएस पद्धत देखील उपलब्ध असणार आहे. यापुढील काळात पुरूष आणि महिला अशा दोन्ही ट्वेन्टी-२० स्पर्धांसाठी देखील डीआरएस प्रणालीला मान्यता दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 1:53 pm

Web Title: super over in place for champions trophy
Next Stories
1 अनुराग ठाकुर यांच्याशी सलगी असणाऱ्या बीसीसीआय कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
2 रामलीला!
3 डेव्हिस चषकाच्या नियोजनाची पुन्हा संधी मिळेल!
Just Now!
X