26 November 2020

News Flash

लंकादहन! कॅप्टन कूल धोनी विजयाचा शिल्पकार

वेस्टइंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात पहिल्या चार चेंडूत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोळा धावा ठोकल्या आणि भारताने तिरंगी मालिका

| July 12, 2013 06:54 am

वेस्टइंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात पहिल्या चार चेंडूत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोळा धावा ठोकल्या आणि भारताने तिरंगी मालिका जिंकली. श्रीलंका संघाला २०१ धावांवर गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना १६७ धावांवर आठ बाद अशी भारतीय संघाची बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, धोनी मैदानात असल्यामुळे  प्रतिस्पर्धीच्या बाजूला झुकलेला सामना खेचून आणण्याचे धोनीचे कसब पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांना  पहावयास मिळाले. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी पंधरा धावांची गरज असताना धोनीने पहिल्या चार चेंडूंमध्ये दोन षटकार व चौकार लगावत सामना जिंकला.  धोनीने सामन्यात नाबाद ४५ धावा केल्या. धोनी सामनावीर तर, भुवनेश्वर कुमार मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2013 6:54 am

Web Title: superb dhoni wins tri nation series for india
टॅग Ms Dhoni,Sri Lanka
Next Stories
1 अगर तुम ना होते…
2 आयसीसी क्रिकेट ‘हॉल ऑफ फेम’मध्ये शेन वॉर्न
3 चेंबूरमधील तरणतलाव म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा!
Just Now!
X