28 September 2020

News Flash

सामन्यांच्या जाहिरातविरहित थेट प्रक्षेपणाचा प्रसार भारतीला अधिकार

सामन्यांच्या जाहिरातविरहित थेट प्रक्षेपणाचा अधिकार प्रसार भारतीला आहे

| May 28, 2016 03:38 am

सामन्यांच्या जाहिरातविरहित थेट प्रक्षेपणाचा अधिकार प्रसार भारतीला आहे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळल्यामुळे स्टार स्पोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला धक्का बसला आहे.
‘‘कोणत्याही जाहिरातींशिवाय सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रसार भारतीने प्रसारित करावे आणि जर ते जाहिरातींसह असल्यास महसुलातील त्यांचा वाटा देण्यात यावा, असे चर्चेनंतर निश्चित झाले आहे,’’ असे न्यायमूर्ती ए. के. सिक्री आणि प्रफुल्ल सी. पंत यांच्या खंडपीठाने दिली.
देशासाठी महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धाचे जाहिरातविरहित थेट प्रक्षेपणाचे प्रसारण प्रसार भारतीला देणे बंधनकारक आहे, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने २०१३मध्ये दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 3:38 am

Web Title: supreme court entitles prasar bharati to advertise free live feed of matches
टॅग Supreme Court
Next Stories
1 सुशीलपेक्षा नरसिंगच योग्य; न्यायालयामध्ये महासंघाची भूमिका
2 विराटने मेस्सीला टाकले मागे!
3 गुजरातची सिंहगर्जना की हैदराबादचा सूर्योदय?
Just Now!
X