आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) सुचविलेल्या त्रिसदस्यीय समितीची कल्पना सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणे शक्य आहे का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश मुकूल मुदगल यांना केली आहे. यावर आज दुपारी दोनपर्यंत उत्तर देण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.
‘बीसीसीआय’ने आयपीएल स्पॉट फिक्सिंगबाबतीत कारवाई करण्यास सुरूवात करावी असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ‘बीसीसीआय’ने ‘सीबीआय’चे माजी संचालक आर.के.राघवन, माजी न्यायाधीश जे.एन.पटेल आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांची समिती नेमण्याची कल्पना सर्वोच्च न्यायालयाला दिली. या त्रिसदस्यीय समितीतील रवी शास्त्री ‘बीसीसीआय’शी करारबद्ध आहेत, तर ‘बीसीसीआय’च्या प्रभारी अध्यक्षांशी जे.एन.पटेल यांचे संबंध असल्याची माहिती समोर आली. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून ‘बीसीसीआय’च्या या त्रिसदस्यीय समितीच्या कल्पनेला पूर्णविराम मिळाला आहे.
पवार यांचा बीसीसीआयवर निशाणा!