भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांना आयपीएलची फ्रँचाईजी घेण्याबाबत केलेली घटनादुरुस्ती बारकाईने तपासण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
आयपीएलमध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी फ्रँचाईजीची मालकी असण्यावरून एन.श्रीनिवासन व आय.एस.बिंद्रा यांच्यात शाब्दिक मतभेद निर्माण झाले आहेत. न्यायालयाच्या टी.एस.ठाकूर व एफ.एम.आय.कलीफुल्ला यांच्या खंडपीठाने याबाबत मंडळाने आपली बाजू मांडावी, असा आदेश दिला आहे.
‘‘बीसीसीआयने २००८ मध्ये घटनादुरुस्ती करीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आयपीएल व चॅम्पियन्स लीगमधील संघ विकत घेण्यास परवानगी दिली होती. हेच वादाचे मूळ कारण आहे. तेव्हापासूनच क्रिकेटमध्ये सतत गोंधळ निर्माण झाला आहे,’’ असे बिंद्रा यांचे कायदेशीर सल्लागार राजीव धवन यांनी म्हटले आहे.
श्रीनिवासन यांचे कायदेशीर सल्लागार कपिल सिब्बल यांनी सांगितले की, ‘‘घटनादुरुस्तीबाबत झालेल्या सभेचा मसुदा बिंद्रा यांनी तपासला आहे. त्यांनी घटनादुरुस्तीला आव्हान दिलेले नाही. फ्रँचाईजीमधील सहभाग हाच त्यांनी वादाचा मुद्दा बनवला आहे.