आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांचा सोमवारी पराभव झाला. निवडणुकीत ब्रिगेडिअर दहलान जुम्मान अल हमाद विजयी झाले. हमाद यांच्याकडे याआधी महासंघाचे उपाध्यक्षपद होते, तर  कलमाडी हे महासंघाचे विद्यमान अध्यक्ष होते. सन २००० पासून कलमाडी अध्यक्षपदाच्या खुर्चीत होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावर असल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. निवडणुकीत ४५ देशांच्या प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला.