सुरेश रैनाने टी-20 क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा सुरेश रैना पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळत असताना रैनाने पद्दुचेरीविरुद्ध हा विक्रम केला. या सामन्यात 12 वी धाव घेत रैनाने हा अनोखा विक्रम साधला. योगायोगाने रैनाचा हा 300 वा टी-20 सामना होता. धोनीनंतर टी-20 क्रिकेटमध्ये 300 सामने खेळणारा रैना दुसरा खेळाडू ठरला आहे.

या यादीमध्ये विराट कोहली रैनाच्या पाठीमागे आहे. विराट कोहलीच्या नावे टी-20 क्रिकेटमध्ये 7833 धावा जमा आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये सुरेश रैना या यादीमध्ये सहाव्या स्थानावर आहे. या यादीत ख्रिस गेल पहिल्या, ब्रँडन मॅक्युलम दुसऱ्या, कायरन पोलार्ड तिसऱ्या, शोएब मलिक चौथ्या, डेव्हिड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे. सध्याच्या घडीला सुरेश रैनाचं भारतीय संघातलं पुनरागमन कठीण मानलं जात आहे. आगामी आयपीएल क्रिकेटमध्ये रैना चेन्नई सुपर किंग्जकडून पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसेल.

अवश्य वाचा – Video : बॉडीगार्डच्या बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला विराट, दिलं खास गिफ्ट