News Flash

सुरेश रैनानं स्वत: ला म्हटलं ‘ब्राह्मण’; भडकलेले नेटकरी म्हणाले, “तुला लाज…”

रैनाच्या वक्तव्यामुळं सोशल मीडियावर खळबळ

सुरेश रैना

भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना एका नव्या वादात अडकताना दिसत आहे. एका वक्तव्याने रैनाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेल्या रैनाला तामिळनाडू प्रीमियर लीगच्या (टीएनपीएल) पाचव्या मोसमातील सामन्यात समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. समालोचनादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना रैनाने स्वत: ला ब्राह्मण म्हटले. त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.

या सामन्यादरम्यान एका समालोचकाने रैनाला विचारले, की त्याने दक्षिण भारतीय संस्कृती कशी स्वीकारली आहे. त्याला उत्तर म्हणून सुरेश रैना म्हणाला, ”मला वाटते, मी देखील ब्राह्मण आहे. मी २००४ पासून चेन्नईत खेळत आहे. मला इथली संस्कृती आवडते. मला माझ्या साथीदारांवर प्रेम आहे. मी अनिरुद्ध श्रीकांतबरोबर खेळलो आहे. सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि बालाजी देखील तेथे आहेत. मला चेन्नईची संस्कृती आवडते. मी भाग्यवान आहे की मी सीएसकेचा भाग आहे.” रैना २००८ पासून सीएसकेकडून खेळत आहे.

रैनाने स्वत: ला ब्राह्मण म्हणणे, नेटकऱ्यांना आवडले नाही. एका यूझरने लिहिले आहे, की सुरेश रैना, तुला स्वतःची लाज वाटली पाहिजे. तू इतकी वर्षे खेळूनही चेन्नईची खरी संस्कृती कधी अनुभवली नाहीस.

 

 

 

हेही वाचा – ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद

सुरेश रैनाची कारकीर्द

रैनाने भारतासाठी २२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.३१च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. त्याने ५ शतके आणि ३६ अर्धशतके झळकावली. टी-२० मध्ये रैनाने ६६ डावात २९.१८च्या सरासरीने १६०५ धावा केल्या. रैनाच्या नावावर एक टी-२० शतक आहे. रैनाने १८ कसोटी सामनेदेखील खेळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 3:56 pm

Web Title: suresh raina called out for brahmin comment during tnpl 2021 commentary adn 96
Next Stories
1 ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद
2 “हारकर जितने वाले को…”, दीपक चहरच्या कामगिरीवर क्रिकेटपटूंनी दिल्या जबरदस्त प्रतिक्रिया
3 VIDEO : श्रीलंकेला पराभवाचं पाणी पाजल्यानंतर भारताच्या खेळाडूंनी केलं ‘असं’ सेलिब्रेशन
Just Now!
X